ह्याचाशी माझे नाते आहे…


(माझ्या मैत्रिणी (दिव्या) साठी काही ओळी) - visit divyaranadive.blogspot.com

हवा हवा सा वाटणारा जिव्हाळा,
तो पहिला मादक स्पर्शाचा निवारा,
ह्याचाशी माझे नाते आहे…

तान्ह्या बाळाने आईची घट्ट पकडलेली करंगळी,
अनाथ आश्रमात बाळाने मारलेली किंकाळी,
ह्याचाशी माझे नाते आहे…

ती देवघरा पुढची साठलेली धूप ची राख,
स्मशानात गरम असलेली शरीराची राख,
ह्याचाशी माझे नाते आहे…

तो गुलाबांचा दरवळलेला  सूवास,
आणि त्याच गुलाबांचा झालेला मुखवास,
ह्याचाशी माझे नाते आहे…

वडाच्या झाडावर उंच गेलेला झोका,
वटपूर्णिमे साठी नेहमी सज्ज असलेला…
त्या तोडून दिलेल्या वडाशी माझे नाते आहे…

नव्याने आयुष्य सुरु करण्याचे स्वप्नं,
अंधार्या खोलीत सुरकुत्या पडलेलं ते जोडपं,
ह्याचाशी माझे नाते आहे…

कविते ला कविता नं म्हणून, त्याला जोपासण्याची, 

दिव्य मधली दिव्या, कविते मधली काव्या…
ह्याचाशी, वाचकांशी माझे नाते आहे…


Comments

 1. Dear Divya, To honor your thoughts and expressions, here's a small poem just for you... Keep Writing!!!

  ReplyDelete
 2. i am speechless.... utterly speechless...
  Kahich nai suchat ahe ya war bolayla !!!!.....
  Thank you so much.......!!!
  Anek anek dhanyawaad..... itki olakh patli asel asa kadhi watlach nahi.... aplya mitrani aplya sathi chaar oli lihilya.... ya peksha ajun kahich mothi goshta asu nai shakat!!! :)
  Thanks s ton Vinit!!!

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

तू खरंच होतीस का?

मी आणि ती!